हजारो योगप्रेमींच्या उपस्थितीत योगदिन साजरा

0
नंदुरबार । दि.21 । प्रतिनिधी-जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विविध शाळा, संस्था, शासकीय कार्यालयांतर्फे योगासनाचे आयोजन करण्यात आले होते.
विश्व योगदिन संयोजन समितीतर्फे आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हजारो योगप्रेमींनी योगासने करून योगदिन साजरा केला.

नंदुरबार राष्ट्रीय छात्रसेना
नंदुरबार । प्रतिनिधी- 49 महाराष्ट्र बटालियनतर्फे नंदुरबार येथील एकलव्य विद्यालय, डी.आर.हायस्कुल व जी.टी.पाटील महाविद्यालयातील छात्रसैनिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस एकलव्य विद्यालय मैदानावर साजरा करण्यात आला.

योगाचे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनण्य साधारण महत्त्व आहे. योगामुळे व्यक्तीमत्त्व विकास, शारिरीक बळकटी, स्वस्थ तसेच विविध आजारांपासून निवारण व आत्मविश्वास वृद्धी असे अनेक फायदे आपणांस अनुभवावयास येतात.

21 जून हा योग दिवस म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो. लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत विविध योगासनांचे फायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा दिवस आयोजित केला जातो.

येथील छात्रसैनिकांसाठी योग दिवस आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पं.खा.भि.सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहास नटावदकर उपस्थित होते.

एकुण 151 छात्रसैनिकांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला. योग मार्गदर्शक म्हणून प्रा.एस.ए.पाटील यांनी काम पाहिले. अनुलोम-विलोम, भस्रीका, कपालभाती, वज्रासन, शिर्षासन, सुर्य नमस्कार असे महत्त्वाचे आसनांबद्दल सहभागींना प्रेरित करण्यात आले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी विलास वाघ, राहुल पाटील, डॉ.विजय चौधरी यांनी परिश्रम घेतले.

श्रॉफ विद्यालयात योगासन स्पर्धा
नंदुरबार । प्रतिनिधी- येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये जागतिक योग दिनानिमित्त जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धा घेण्यात आली. यावेळी स्पर्धेत 118 योगापटूंनी सहभाग नोंदविला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय नंदुरबार व नंदुरबार जिल्हा योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेचे आयोजन श्रीमती हि.गो. श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार येथे करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्या सुषमा शाह यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, मुख्याध्यापिका शाह, योगा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चौधरी, तालुका क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे, मिलिंद वेरुळकर, योग शिक्षक सी.एन.पाटील, प्रा.सुनिल पाटील, टेनिक्वाईट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज पाठक, श्रीराम मोडक, राजेश शहा, दिनेश ओझा, स्पर्धा संयोजक प्रा.मयुर ठाकरे, राकेश माळी, जितेंद्र पगारे, शांताराम मंडाले आदी उपस्थित होते.

जिल्हाभरातून 118 खेळाडूंनी स्पर्धेस उपस्थिती दर्शविली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू खुशबू घरटे, पलक पटेल, मेघा धनगर, सोमेश जोशी आदी खेळाडूंनी योगाची प्रात्याक्षिके दाखविली.

स्पर्धेत 14 वर्षाआतील मुलांच्या गटात प्रथम कुलदिप पाटील, द्वितीय भगत कारंडे, तर तृतीय चेतन पाटील, तर मुलींमध्ये प्रथम दिव्या बोराणे, द्वितीय राजवी बच्छाव तर तृतीय निकिता बैसाणे, 17 वर्षाआतील मुलांच्या गटात प्रथम सोमेश जोशी, द्वितीय अक्षय पावरा तर तृतीय हरिष निकम, मुलींच्या गटात प्रथम मेघा धनगर, द्वितीय पायल जाधव, तृतीय किर्ती राजपूत, 19 वर्षाआतील मुलांच्या गटात प्रथम नकुल चौधरी, द्वितीय राजु सोलंकी व तृतीय भुषण माळी, तर मुलींच्या गटात प्रथम पुनम भाटी, द्वितीय अंजु भिल तर तृतीय माधवी घाटे.

स्पर्धेला पंच म्हणून शांताराम मंडाले, जितेंद्र माळी, राकेश माळी, खुशबू घरटे, प्रा.सुनिल पाटील, मनिष सनेर आदींनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल पाटील यांनी केले. आभार मयुर ठाकरे यांनी मानले.

यशवंत विद्यालय
नंदुरबार । प्रतिनिधी- येथील यशवंत विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना योगासनाची प्रात्यक्षिके व योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व शारदा प्राथमिक विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय योगपटू खुशबु घरटे व मेघा धनगर या खेळाडूंनी योगासनाची प्रात्यक्षिके मंचावरुन दाखविली. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य शिवाजी पाटील, पर्यवेक्षक अरुण हजारी, मुख्याध्यापक सुनिल पाटील, आनंदा पाटील, प्रा.डी.एस.नाईक, प्रा.शैलेंद्र पाटील आदींसह प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योगा केला.

यावेळी महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा.मयुर ठाकरे यांनी योगाचे महत्त्व व योगाबद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात दररोज योगा करण्याचा निश्चय करण्यात आला.

डी.आर. हायस्कूल
नंदुरबार । प्रतिनिधी- येथील नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती दुर्गाबाई रघवंशी हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयात विश्व योग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्राचार्य जी.एस. हिवरे, उपप्राचार्य एस.व्ही. चौधरी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, योग खेळाडू, एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट, स्काऊट विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत विश्व योग दिन साजरा करण्यात आला.

त्यानिमित्ताने योगाचे महत्व, संकल्प, मंत्र स्पष्ट करण्यात आले. शासकीय नियमाप्रमाणे योग, योगासने, सुक्ष्म व्यायाम, प्राणायमची आवर्तने करण्यात आली. कार्यक्र्रमाचे संचलन क्रीडा शिक्षक प्रा.नितीन कबाडे व श्रीराम मोडक यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.डॉ.उमेश शिंदे, पी.बी. जानी, निलेश गावीत, जगदीश बच्छाव, प्रा.संजय पाटील या सहकारी शिक्षकांनी केले.

नवजीवन विद्यालय, वाघाळे
नंदुरबार । प्रतिनिधी- तालुक्यातील वाघाळे येथील नवजीवन विद्यालयात योगदिन साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक पुष्पेंद्र रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली योगशिक्षक एस.के. रघुवंशी यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांकडून प्राणायमाचे प्रात्यक्षिके करवून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार
नंदुरबार । प्रतिनिधी- येथील जी.टी.पाटील महाविद्यालयात जागतिक योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस. श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ.आर.आर. कासार, उपप्राचार्य डॉ.एम.जे. रघुवंशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.के. शवाळे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

तसेच जी.टी पाटील गुडमार्निंग गृपचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जी.टी. पाटील महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.एन.एस. पवार व इंग्रजी विभागाचे प्रा.बी.के. महाले यांनी योगासनाबद्दल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.टी.एल. दास यांनी केले. आभार प्रा.एस.डी. घाटे यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*