नवापूर मानवाधिकार मेळाव्याचे आयोजन

0
नंदुरबार । दि.27 । प्रतिनिधी-मानवाला त्यांचा अधिकारा प्रती जागृत करणे हे मानव अधिकार संघटनेचे कार्य आहे असे प्रतिपादन मुंबई येथील आंतर राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सनी शाह यांनी नवापूर येथील मेळाव्या प्रसंगी केले.
गुजरात व महाराष्ट्र येथील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी वाचनालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रदेश अध्यक्ष गोविंद बिशेन, सुनील गामीत, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बिशप ओमकार, प्रदेश सचीव रमेश गावीत, रमेश पाडवी, सुरेश माहला, डॉ. चद्रशेखर, डॉ.डिसुजा भरूच, जिल्हाध्यक्ष संदिप बरगडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी महाराष्ट्र काउन्सील सदस्य नोंदणी करण्यात आली. पदाधिकारी यांना डॉ शाह यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.

यावेळी डॉ. बिशप ओमकार, गोविंद बिशेन, सुनिल गामीत यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश वळवी यांनी तर उपस्थितीतांचे आभार प्रदेश सचिव रमेश गावीत यांनी मानलेत.

 

LEAVE A REPLY

*