प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड लावावे !

0
नंदुरबार । दि.06 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केल्यास शासनाचा वृक्ष लागवडीचा संकल्प खर्‍या अर्थाने पुर्ण होण्यास मदत होईल, परिणामी जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे प्रतिपादन खा.डॉ. हिना गावीत यांनी केले.
शासनाचा 4 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील पाचोरा-बिलाडी रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी खा.डॉ.हिना गावीत बोलत होत्या. यावेळी आ.डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील, उपवनसंरक्षक श्रीमती पियुषा जगताप, तहसिलदार नितीन पाटील, सामाजिक वनीकरणाचे विभागाची उपसंचालक एस.आर. मोरे, सहाय्यक संचालक आर.एन. जेजुरकर, सहाय्यक उपवनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, जावेद शेख पाचोराबारीचे सरपंच राघो वळवी आदी उपस्थित होते.

खा.डॉ. हिना गावीत पुढे बोलतांना म्हणाल्या, झाडे लावल्यानंतर त्याच्या संगोपनाचे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्वच रस्ते वृक्ष लागवडीसाठी दत्तक घेवून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करणे आवश्यक असल्याचेही खा.डॉ.गावीत यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

*