maharashtra नंदुरबार मुख्य बातम्या

हनुमान जन्मोत्सवानिमित्त चोवीस तास रामधून व 151 किलोचा प्रसाद

नंदुरबार । जिल्ह्यासह शहरात हनुमान जन्मोत्सवा निमित्त विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यात केसरीनंदन हनुमान मंदिरात 24 तास अखंड रामधून कोपर्ली येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त शोभायात्रा,यासह शहरातील संकटामेचन हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त 151 किलोचा लाडुंचा प्रसाद चढवण्यात आला.शहरात आज विवीध ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी 24 तास अखंड रामधून येथील टिळक रोड परिसरातील केसरीनंदन हनुमान मंदिरात व्यापारी मनोज भन्साळी यांच्यावतीने 24 तास अखंड रामधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कारटेक पचाळा ता. साक्री येथील भजनी मंडळच्या कार्यकर्त्यांनी रामधून सादर केले. यात वयोवृद्धांच्या सहभाग मोठ्या प्रमाणावर लाभला. नगरसेवक आकाश चौधरी, उद्योगपती विलास राजपूत व राजपूत समाजाचे ज्येष्ठ नेते भीमसिंग राजपूत यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सकाळपासूनच मंदिरात भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रोहित चौधरी, बंटी अग्रवाल, सुनील भन्साळी, लक्ष्मण माळी,प्रकाश गिरी महाराज,सुशीलाबेन व्यास,मदन कोठारी उपस्थित होते

कोपर्ली येथे शोभायात्रा
तालुक्यातील कोपर्ली येथे श्री क्षेत्र कष्टभंजन हनुमान मंदिर व शनी मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा तसेच भंडारा महाप्रसादाचे आयोजन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. तालुक्यातील कोपर्ली येथे कष्टभांजन हनुमान मंदिर व शनी मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त दि 19 एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्म महाअभिषेक पूजन शनि देवता प्राणप्रतिष्ठा शोभायात्रा मिरवणूक तसेच महाआरती सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंतगावात शोभायात्रा काढण्यात आली. त्यात परिसरातील भाविक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते शोभा यात्रेदरम्यान राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या सजीव देखावा सादर करण्यात आला होता तसेच महाप्रसाद भंडारा सकाळी 11 वाजेपासून सुरू करण्यात आला भाविकांनी त्याचा लाभ घेतला.

सदर कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते पूजन करून महाआरती करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील पंचक्रोशीतील मान्यवर व भाविकांनी हजेरी लावली. सदर कार्यक्रमात ग्रामस्थ व भिका बापू मित्रमंडळाचे व परिवाराचे सदस्य सह विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी भिका चौधरी प्रकाश चौधरी वसंत चौधरी नवीन बिर्ला त्यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे पूजनासाठी नाशिक येथील आशिष गव्हाले आकाश कुलकर्णी योगेश कुलकर्णी मयुर जोशी रवींद्र गव्हाले हे ब्रह्मवृंद उपस्थित असणार आहेत यज्ञाचे प्रधानाचार्य किशोर गव्हाले राकेश पाठक हे होते. सदर धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातून व पंचक्रोशीतून भाविक व कोपर्ली ग्रामस्थांतर्फे तसेच भिका बापू चौधरी मित्र परिवारातर्फे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!