गुजर समाजाचा आज सामुदायिक विवाह सोहळा

विवाहासाठी 20 हजारांवर उपस्थिती; तयारी अंतिम टप्प्यात

0
नंदुरबार । समस्त लेवा पाटीदार गुजर समाज, गुजर समाज मंचतर्फे चौथा सामुदायिक विवाह सोहळा उद्या रविवार दि. 10 फेब्रुवारी रोजी लहान शहादा येथे आयोजित करण्यात आला असून विवाहसोहळ्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे

नंदुरबार तालुक्यातील लहान शहादा येथे जवाहरलाल नेहरू विद्यालयासमोर भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.या ठिकाणी उद्या रविवारी 18 जोडप्यांचे शुभमंगल होणार आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून समस्त लेवा पाटीदार गुजर समाज,गुजर समाज मंच तसेच विविध शहरे ग्राम गुजर मित्र मंडळाच्या वतीने तयारी करण्यात येत होती. महाराष्ट्र,गुजरात व मध्यप्रदेशातून 20 हजारांवर वर्‍हाडी उपस्थित राहण्याचा अंदाज आयोजकांकडून वर्तविण्यात आलेला आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून तयारी पूर्ण करण्यासाठी समाजातील युवक परिश्रम करीत आहेत. तयारी अंतिम आता टप्प्यात आलेली आहे. विवाह सोहळ्यात 18 जोडप्यांचे शुभमंगल सकाळी 10.25 वाजता होणार आहे.मंडपात वधू-वरांसाठी स्वतंत्र बैठकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मनुष्यबळ,आर्थिक आघाडी, अन्नदान याबरोबरच विवाहसोहळ्यातील पावित्र्य राखण्यात गुजर समाजाला अभूतपूर्व यश आलेले आहे.समाजातील युवकांकडून या कार्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. विवाहसोहळ्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.त्यात स्वागत समिती,भोजन समिती, मंडप समिती,स्वच्छता समिती, पाणी पुरवठा,इलेक्ट्रिक समिती, ध्वनिक्षेपक समिती,वधू-वर मिरवणूक समिती,सजावट समिती,अकस्मात समिती आदी विविध समित्यांच्या समावेश करण्यात आलेला आहे

या समित्यांच्या माध्यमातून समाजातील युवक हिरीरीने सहभाग घेत आहेत.विवाहसोहळ्यासाठी महाराष्ट्र मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने वर्‍हाडी मंडळी व त्यांच्यासोबत समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात एखाद्याला इजा झाली किंवा प्रकृती बिघडले तर त्यांचवर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आलेले आहे.वैद्यकीय पथकामध्ये गुजर समाजातील काही डॉक्टर्स सेवा बजावणार आहेत.

LEAVE A REPLY

*