वस्तू व सेवा कर कार्यालय नामकरण

0
नंदुरबार । दि.1 । प्रतिनिधी-देशभरात आजपासून लागू करण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्यात आल्यामुळे विक्रीकर कार्यालयाचे नाव वस्तू व सेवाकर कार्यालय असे करण्यात आले आहे.
1 जुलै 2017 पासून संपूर्ण देशात वस्तू व सेवा कर कायदा लागू झाला आहे. या करप्रणालीबाबत दडपण घेऊ नये. कर प्रणाली लागू करताना काही कायदेशीर तरतुदी, प्रक्रियांमध्ये अडचणी असतील त्या लवकरात लवकर सोडविल्या जातील.
कापड उद्योगातील व्यापार्‍यांप्रमाणे जे करदाते नव्यानेच कर भरण्यास पात्र आहेत, त्यांना 30 जुलै पर्यंत अर्ज सादर करता येईल, अशी माहिती विक्रीकर उपआयुक्त यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

उद्योजक व व्यापार्‍यांसाठी ही कर पध्दत सोपी असून त्यातील तरतुदीमुळे वस्तू व सेवांच्या किंमतीत घट होऊन ग्राहकांना त्याचा फायदा होईल.

सदर कर पध्दतीबाबत माहिती देण्यासाठी तसेच त्याबाबतच्या शंकाचे निरसन करण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागातील (पुर्वीचा विक्रीकर विभाग) अधिकार्‍यांनी महाराष्ट्रात जवळपास 425 ठिकाणी कार्यशाळा घेतलेल्या आहेत.

तसेच व्यापार्‍यांना नोंदणी, विवरणपत्र दाखल करणे इत्यादी बाबत येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागाच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यालयामध्ये जीएसटी सुविधा केंद्र उभारण्यात आलेले आहेत.

शासनाने सर्व करदात्यांच्या खर्‍या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिलेले असून सर्व व्यापारी संघटना, उद्योग संघटना आदींनी आपल्या सभासदांच्या अडचणी एकत्रीत करुन वस्तू व सेवाकर विभागाकडे अथवा शासनाकडे सादर कराव्यात, त्याबाबत विचारविनिमय करुन कार्यवाही केली जाईल.

ज्या करदात्यांना नव्याने नोंदणीसाठी अर्ज करावयाचा आहे, त्यांनी वस्तू व सेवा कर विभागातील जीएसटी सुविधा केंद्र तसेच शासनमान्य ई-सेवा केंद्रातून मदत घेऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. वस्तू व सेवाकर कायद्याखाली सुरुवातीचे दोन महिने ॠडढठ 3 इ नमुन्यात विवरणपत्र तयार करण्यासाठीची युटीलीटी वस्तू व सेवाकर विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

वस्तू व सेवा कर लागू झाल्यामुळे आतापर्यंत विक्रीकर कार्यालय म्हणून अस्तित्वात असलेल्या कार्यालयाचे वस्तू व सेवाकर कार्यालयात रुपांतर करण्यात आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*