Type to search

Breaking News maharashtra नंदुरबार

स्कॉर्पियोच्या धडकेत आजोबा व नातूचा मृत्यू

Share
नांदगाव : पोटच्या मुलीचा बापासमोर मृत्यू तर पत्नीने दवाखान्यात सोडला जीव Nandgoan Wife and Daughter Dead in Eicher-Motorcycle Accident

नंदुरबार – 

तालुक्यातील घोटाणे गावाजवळ भरधाव स्कॉर्पीयोने धडक दिल्याने मोटरसायकलवरील आजोबा व नातूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील नानाभाऊ उखा धनगर हे त्यांचा नातू भटु धनगर यांच्यासोबत मोटरसायकल (क्र.एम.एच.39- एच. 6724) ने दोंडाईचा येथे गव्हाचे बियाणे घेण्यासाठी जात असतांना,

आज दि.25 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घोटाणे गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर स्कॉर्पीयो गाडी (क्र.जी.जे.19- ए. 8362) यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून समोरून येणार्‍या मोटरसायकलला धडक दिली.या अपघातात नानाभाऊ उखा धनगर, भटु राकेश धनगर दोन्ही. रा. घोटाणे (ता.जि.नंदुरबार) या दोघांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी जितेंद्र दुर्लभ धनगर रा.घोटाणे ता.नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश जयचंद खवाणे रा.सोनगड (जि.तापी, गुजरात) याच्याविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 279, 304 (अ) 337, 338, 427, मोटरवाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई हर्षल बागल करीत आहेत. याप्रकरणी चौकशीसाठी चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!