Type to search

नंदुरबार

नोकरी देण्याचे आमिष दाखवुन मंदाणा येथील युवकाची साडेसात लाखात फसवणूक

Share

नंदुरबार । शहादा तालुक्यातील मंदाणा येथे युवकाला नोकरीचे आमिष दाखवून साडेसात लाखात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील मंदाणे येथील निखील गौतमचंद जैन या युवकाच्या मोबाईलवर संपर्क करून आरोपी यांनी संगनमत करून त्याला नोकरीचे आमिष दाखवून ईमेलवर डिप्लोमाचे कागदपत्र अपलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून सुमितकुमारसिंग याचा नावावर स्टेट बँक ऑफ डिफेन्स कॉलनी सिकंदराबाद या शाखेत आरोपीचा अकाऊंट नंबरवर 7 लाख 50 हजार रूपये जमा करण्यास सांगून नौकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

निखील जैन या युवकाने बँक खात्यात साडेसात लाख रूपये भरणा केला. त्याने आरोपींना वारंवार नोकरीबाबत विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ केली. पैसे परत मागितले असता. आरोपी यांनी मोबाईल क्रमांक बंद करून घेतला व ईमेल वर देखील उत्तर दिले नाही. म्हणून निखील गौतमचंद जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहिम शर्मा (रा.बैंग्लोर) व संमीत कुमारसिंग रा.सिकंदराबाद याचा दोघा विरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि एस.एस.शुक्ला करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!