नंदुरबार येथे कपडयाचे दुकान जळून खाक, लाखोंचे नुकसान

0
नंदुरबार।  नंदुरबार शहरातील कमलाबाई मराठे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कपडयांचा दुकानाला आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत कपडयांसह दुकान जळून खाक झाले. यात लाखोंचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील कमलाबाई मराठे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये धनराज भिका अहिरे यांचे स्टाईल झोन नावाचे कपडयाचे दुकान आहे. आज दि. 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान शॉटसर्कीटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील कपडे, फर्निचर जळून खाक झाले. यात सुमारे 15 लाखाचा वर नुकसान झाले आहे. आग लागण्यापुर्वी जोराचा आवाज झाला होता. असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पंतप्रधान मुद्रा लोन घेवून कपडयाचे दुकान टाकले होते. याबाबत उशिरापर्यंत पोलीसांकडून पोलीसांकडून घटनेचा पंचनामा सुरू होता.

LEAVE A REPLY

*