Friday, April 26, 2024
HomeUncategorizedशहादा पं.स. व जि.प.च्या निवडणूक मतदान ; पसंतीच्या उमेदवारांना प्राधान्य

शहादा पं.स. व जि.प.च्या निवडणूक मतदान ; पसंतीच्या उमेदवारांना प्राधान्य

शहादा, (प्रतिनिधी) : 

ग्रामीण विकासाची आस लागून असलेल्या मतदारांनी आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आता तरी ग्रामीण भागातील समस्या सुटतील या आशेवर आपापल्या पसंतीचा उमेदवाराला मतदान केले.

- Advertisement -

शहादा तालुक्यात जिल्हा परिषदेचा १४ व पंचायत समितीच्या २८ जागांपैकी एक गण बिनविरोध झाल्याने २७ जागांसाठी आज मतदान झाले. २३ डिसेंबरला इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते .सर्वच पक्षात उमेदवारी मिळवण्यावरुन त्रांगडे निर्माण झाले होते (ता.३०)  माघारीनंतर उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी फक्त सहा दिवस असल्याने सर्वांनीच प्रचारासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सकाळचा सत्रात म्हसावद, पाडळदा, कहाटूळ गटात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत होता.तर इतर गावात अल्पसा प्रतिसाद मिळाला .मात्र दुपारनंतर गर्दी वाढत गेली.

  स्थलांतरित मतदार परतले…..

रोजगारासाठी परराज्यात स्थलांतरित झालेले बहुतांश मतदार मतदानासाठी परतल्याने त्यांचे मत कोणत्या उमेदवाराचा पारड्यात पडते त्यावर संबधित उमेदवाराचा विजय अवलंबून असल्याने सर्वच उमेदवारांनी आपापली शक्ती पणाला लावली आहे.

  दोन ठिकाणी तांत्रिक बिघाड…..

दरम्यान शहादा तालुक्यातील भोरटेक व गोगापुर या दोन ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे मतदान यंत्र बंद पडल्याने काहीवेळ मतदारांना वाट पाहावी लागली तहसील प्रशासनाने तात्काळ नवीन मतदान यंत्र उपलब्ध करून दिल्याने मतदान सुरळीत सुरु झाले.

कार्यकार्यत्यांची अधिक गर्दी…

ग्रामीण भागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत मतदारांपेक्षा कार्यकर्त्यांची अधिक गर्दी मतदान  केंद्रांवर बाहेर दिसत होती. दरम्यान वृद्ध मतदारांना ने-आण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी वाहनाच्या सोयी केल्या होत्या. मतदान करताना एकाच मतदान यंत्रावर गण व गटातील उमेदवाराला मतदान करायचे होते.प्रत्येक उमेदवाराला दोन बटन दाबावे लागत होते. त्यामुळे काही अशिक्षित मतदार गोंधळून जात होते अशा वेळी संबंधित मतदान अधिकाऱ्यांना दोन ठिकाणी मतदान करण्यासाठी सांगावे लागत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या