स्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम

0
नंदुरबार । मनुष्य ही जात व मानवता हा धर्म या संतपरंपरेच्या शिकवणीचा प्रत्यय नंदुरबारकरांना आला. देशभरात धार्मिक तेढ निर्माण करुन सामाजिक अशांतता निर्माण करण्याचे काम सुरु असतानाच डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने सर्व धर्म समभाव आणि मानवतेचा संदेश दिला.

प्रतिष्ठानच्या शेकडो सदस्यांनी सदस्यांनी नंदुरबार व जिल्ह्याभरात 27 स्मशानभूमी व अबुलगाझी कब्रस्तान नंदुरबार येथे स्वच्छता करुन एकात्मतेचे दर्शन घडविले. नंदुरबारमधील अबुलगाझी कब्रस्तान येथे अ.गुफरान पिंजारी, अब्दुल मुनाफ, अब्दुल जब्बार हाजी, रेहमत खाँ अब्दुल्ला, शे.शकील शे.नईमोद्दीन, अब्दुल गफ्फार व शे.फिरोज यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या स्मशानभूमी व कब्रस्तान स्वच्छता अभियानात 816 प्रतिष्ठानचे सदस्य 2 टप्प्यात सहभागी झाले. 27 स्मशानभूमी व कब्रस्तान मधील एकुण 14870 चौरस मीटर परिसर स्वच्छ करण्यात आला. वाढलेली झाडे-झुडपे काढून एकुण 45 टन पाला पाचोळा, वाढलेले गवत, प्लास्टीक पिशव्या, बॉटल्स, इतर कचर्‍याचे संकलन करुन डंपिंग ग्राऊंडवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने टाकण्यात आला.

ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री व महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिनव स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. हिदू-मुस्लिम एकमेचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला. या स्वच्छता अभियानातून दिसून आला.

LEAVE A REPLY

*