ग्रामीण युवकांना सक्षम बनवणे शक्य – डॉ.अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन

0
अक्कलकुवा । दि.20 । प्रतिनिधी-पर्यावरण संतुलन व अर्थकारण यात योग्य समन्वय साधण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांना सक्षम बनविणे आवश्यक आहे. तरच ग्रामीण व शहरी दरी कमी होवू शकेल. आजच्या ज्ञान युगात हे शक्य आहे.
असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी आज नंदुरबार येथे वात्सल्य सेवा समितीतर्फे आयोजित कै.बाळासाहेब पाठक व्याख्यानमालेचे पहिली पुष्प गुंफतांना केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, महाराष्ट्र राज्याच्या राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य डॉ.गजानन डांगे, जिल्हा न्या. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम दिपप्रज्वलन डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गजानन डांगे यांनी केले. नंदुरबारातील देशासाठी जगणार्‍या एका पिढीचे प्रतिनिधी स्व.बाळासाहेब पाठक होते.

त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही व्याख्यानमाला आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. आभार प्रदर्शन वात्सल्य सेवा समितीचे अध्यक्ष पंकज पाठक यांनी केले.

तर परिचय श्रीराम दाऊतखाने यांनी करून दिला. यावेळी बोलतांना डॉ.काकोडकर पुढे म्हणाले की, समाजात वेगवेगळया विचारधारा व वेगवेगळया प्रवृत्ती असतात. पण चांगल्या प्रवृत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी, त्यातूनच समाजाची जडणघडण होते.

आजच्या युगात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे जग सातत्याने पुढे जात असले तरी अनेक प्रश्न समोर उभे राहत आहे. या प्रश्नांमुळे जग नष्ट होते की, काय अशी भिती माणसाला वाटते आहे.

परंतु या समस्यांचे उत्तर देखील या विज्ञान व तंत्रज्ञानातच सामावलेले आहे. असेही ते म्हणाले. तंत्रज्ञानामुळे सुविधा वाढल्या. जग वेगाने पुढे जावू लागले.

तरी त्याप्रमाणात साधन सामुग्री मात्र अपूर्ण आहे. ती विकसीत करण्यासाठी देखील प्रयत्न होणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले. विज्ञानाची व तंत्रज्ञानाची प्रगती करत असतांना त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे उत्तर मानवाला शोधावे लागेल. असेही ते यावेळी म्हणाले.

पुर्वी सारखे जीवन जगणे शक्य नाही. तर त्यासाठी पर्याय उपलब्ध केले पाहिजे. मानवाच्या बुध्दीमत्तेतून जसा तंत्रज्ञानाचा शोध लागला तसे समस्याचेही निराकरण शक्य आहे. असेही ते म्हणाले.

सध्या उर्जा हा मानवा पुढील सर्वात मोठा प्रश्न असून उर्जा निर्मितीसाठी मोठया प्रमाणात कोळसा व खजिन तेलांचा वापर करावा लागतो. त्यामुळे कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते आहे. त्यासाठी उर्जे करीता सौर उर्जा वापरणे किंवा अनु उर्जेचा वापर करणे हा पर्याय आहे.

केवळ विध्वंसासाठी अनुउर्जा न वापरता विधायक कामासाठी देखील अनुउर्जेचा उपयोग होवू शकतो. याचे संशोधन भारतात मोठया प्रमाणात होत असल्याचे त्यांनी सांगितले.

नॅनो टेक्नॉलोजीचा योग्य वापर व अनुशक्तीचा योग्य वापर करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. शाश्वत विकासाचा विकचार करतांना केवळ शहरी क्षेत्र डोळयासमोर ठेवून चालणार नाही तर तंत्रज्ञानाचा आधारे ग्रामीण भागात देखील सर्व प्रकारचा विकास व्हावा, उद्योगाचे विकेंद्री करण व्हावे अशी गरज त्यांनी व्यक्त केली.

समाजात आता शिक्षणाला लाईफ लाँग लर्निंगची गरज आहे. तरच जगातील समस्यांचे उत्तम संतुलन भारताला करणे शक्य आहे असेही ते म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*