डॉ.आंबेडकर जयंती व क्रांतीवीर खाज्या नाईक स्मृती दिनानिमित्त रक्तदान व मोतीबिंदू तपासणी

खुंटामोडी येथे 14 जोडप्यांनी एकत्रित केले रक्तदान

0
नंदुरबार । मोलगी-विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व क्रांतीवीर खाज्या नाईक यांच्या स्मृती दिनानिमित खुंटामोडी ता. धडगाव येथे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले. मोतीबिंदू तपासणी एकूण 115 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातून शस्त्रक्रिया करीता एकूण 23 रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आले.त्यांच्यावर कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय नंदुरबार येथील तज्ञ डॉक्टरांकडून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

रक्तदान शिबीराकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 106 रक्तदात्यांनी रक्तदान करून या महादानात सहभाग नोंदवला. यात 14 जोडप्यांनी एकत्रित रक्तदान करून आदर्श समाजासमोर ठेवला. महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.याकरिता जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील रक्तपेढी टीम व ग्रामीण रुग्णालय धडगाव येथील कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमास उपसरपंचगेमलसिंग वळवी अध्यक्षस्थानी होते. डॉ. संतोष परमार व डॉ. गिरीष ईशी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.तसेच गावातील सर्व मंडळी व प्रमुख मान्यवर उपस्थित राहिले.

रक्तदान केलेल्या दात्यांचा रक्तपेढी प्रमाणपत्र, व उत्सव समिती कडून गौरवपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गंगाराम परमार सर यांनी केले. व प्रास्ताविक विजय ब्राम्हणे यांनी मांडले. दुसर्‍या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत मधून व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम मधून विविध कलागुणांचे दर्शन घडविण्यात आले. कार्यक्रमास रायसिंग वळवी, सातपुडा समाज उत्कर्ष प्रतिष्ठान धडगाव अंतर्गत गणेश पराडके उपस्थीत होते.विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप राठोड यांनी केले.प्रास्ताविक.मगन सोमा परमार यांनी केले.

भरत नवेज यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी उपसरपंच गेमलसिंग वळवी, गंगाराम परमार, भरत नवेज,दिलीप राठोड, शिवाजी नाईक,दिलवरसिंग वळवी, सखाराम नवेज, सुनील परमार,मगन परमार, मनोज नवेज, हरीषचंद्र परमार, मगन राठोड, दिनेश परमार, नटवर राठोड, गौतम परमार, जयंती उत्सव समिती सर्व सदस्य,उत्सव समिती स्वयंसेवक, गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*