पीओएस मशिनद्वारे अन्नधान्य वितरीत न करणे भोवले, 77 स्वस्त धान्य दुकानदारांवर कार्यवाही

0
नंदुरबार । पॉस मशिनद्वारे अन्नधान्य वितरीत न करणार्‍या 77 स्वस्त धान्य दुकानदारावर पुरवठा विभागाने कारवाई केली आहे. यातील 21 दुकानदारांची 100 टक्के तर 56 दुकानदारांची 50 टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना पॉस मशीनव्दारे अन्नधान्य वाटप करण्याच्या शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, डिसेंबर 2018 मध्ये ज्या रास्तभाव दुकानदारांचे पॉस मशीनव्दारे धान्य वाटपाचे प्रमाण 0 टक्के असल्याचे आढळून आले आहे. त्यांची 100 टक्के अनामत रक्कम जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्याप्रमाणे अक्कलकुवा तालूक्यातील-1, अक्राणी तालुक्यातील -14, नंदुरबार तालुक्यातील-3, आणि शहादा तालूक्यातील-3 अशाप्रकारे जिल्हयातील एकूण 21 रास्तभाव दुकानदारांवर कार्यवाही करण्यात आलेली आहे.

ज्या रास्तभाव दुकानदारांचे पॉस मशीनव्दारे धान्य वाटपाचे प्रमाण 50 टक्के पेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे, त्यांची 50 टक्के अनामत रक्कम जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्याप्रमाणे अक्कलकुवा तालुक्यातील- 6, अक्राणी तालुक्यातील-13, नंदुरबार तालुक्यातील-11, नवापूर तालुक्यातील-8, शहादा तालुक्यातील-17 आणि तळोदा तालुक्यातील-1 अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण 56 रास्तभाव दुकानदारांवर कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*