धुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार

0
नंदुरबार। नंदुरबार-धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील नवापुर जवळ 18 चाकी ट्रकच्या इंजिनाने अचानक आग लागल्याने ट्रकने पेट घेतला यात 34 टन साखरेच्या गोण्या काही प्रमाणात जळाल्या,सुदैवाने जीवीतहानी टळली ट्रकची आग विझवण्यासाठी पालीकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले.

याबाबत अधीक माहिती अशी की,धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नवापुर जवळ सावरट गावाच्या शिवारात सोलापूरहून सुरतच्या दिशेने राजस्थान जात असताना 18 चाकी ट्रक (क्रमांक आर.जे.19जी.इ. 0421) ने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून स्वतचे प्राण वाचले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.परंतु त्यात असलेले 34 टन साखरेच्या गोण्या काही प्रमाणात जळून साखर वितळून गेली.

या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. नवापूर नगरपरिषदेचे अग्निशमन दलाच्या मदतीने पेटलेल्या ट्रकची आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही.सलग दोन ते तीन दिवसचा प्रवास करुन तसेच वाढलेली उष्णता यामुळे महामार्गावर मार्गक्रमण करतांना वाहनधारकांनी वाहने काळजी पुर्वक हाताळावी. वाहनांची नियमित तपासणी करण्यात यावी जेणेकरून अशा वाहने पेटण्याची दुर्घटना होणार नाही.

घटनास्थळी चिंचपाडा दुरक्षेत्र पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सोनवणे व पोलिस कॉन्स्टेबल जाधव यांनी धाव घेऊन परिस्थिती वर नियंत्रण व वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंची वाहतूक व्यवस्था बंद ठेवून आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहने पुर्ववत सुरु केली.

LEAVE A REPLY

*