Type to search

धुळे नंदुरबार

पिंपळनेर-दहिवेल रस्त्यावर सुताच्या बंडलसह ट्रक खाक

Share

पिंपळनेर/नंदुरबार । वार्ताहर/प्रतिनिधी- पिंपळनेर – दहिवेल रस्त्यावर धवळीविहीर गावाजवळ आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास गुजरात येथून सुत बंडल भरलेला ट्रक मालेगावकडे जातांना अती उष्णता, रस्ता तापलेला, टायर गरम होऊन पेटला. तापमान वाढल्यामुळे उष्णतेने ट्रकमधील वायरलुमने पेट घेतला.

ट्रकमध्ये सुती बंडल असल्याने काही वेळातच संपुर्ण ट्रकने पेट घेतला. चालकाने गाडीतुन उडी मारून आरडा ओरड केली. यावेळी धवळीविहीरचे पोलीस पाटील कन्हैया चैञाम पवार हे मदतीला धावून आले. त्यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्याला कळविले. माहिती मिळताच घटनास्थळी एपीआय पंजाबराव राठोड, बीट हवालदार बैसाणे, सोनवणे, राजपुत हे दाखल झाले. साक्रीतून अग्नीशामक बंबला मागवून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बंबातील पाणी सपंल्यानंतर धवळीविहीर येथे विज नसल्याने बंब तेथे भरता आला नाही. नंतर पिंपळनेर येथून बंब भरून आग आटोक्यात आणली. माञ तोपर्यंत ट्रक जळून खाक झाला. सुदैवाने जिवित हानी झाली नाही. पुढील तपास एपीआय पंजाबराव राठोड करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!