Type to search

Breaking News नंदुरबार

मोरखी येथे साडेसहा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

Share

नंदुरबार  – 

 

अक्कलकुवा तालुक्यातील मोरखी तीनखुन्या येथे राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने एका शेतात टाकलेल्या धाडीत सुमारे साडेसहा लाखांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. यावेळी संशयीत रात्रीचा अंधाराचा फायदा घेत फरार झाल्याची घटना घडली आहे.

राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील मोरखी येथे एका शेतात धाड टाकली. यावेळी गवताच्या पेंडयांखाली लपविलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्काच्या हाती लागला.

रात्री एक वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्काने सदरी धाड टाकली. यावेळी अंधाराचा फायदा घेत संशयीत किंसन रामा वसावे याने घटनास्थळावरन पळ काढला. त्याच्याविरोधात मुंबई दारूबंदी कलम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने जप्त केलेल्या अवैध विदेशी मद्यसाठयात एक बॉम्बे स्पेशल व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या एकूण तीन हजार 700 बाटल्या 74 बॉक्समध्ये आढळून आल्या तसेच सोमपॉवर दहा सुपरस्ट्राँग बिअरचे 74 बाक्स असा एकूण सहा लाख 46 हजार 480 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कामगिरी राज्य उत्पादन शुल्काच्या भरापी पथकातील निरीक्षक मनोज संबोधी, खेडदिगर येथील निरीक्षक अनुपकुमार देशमाने, हेमंत पाटील, अजय रायते, अविनाश पाटील, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बडगुजर, हवालदार जाधव, विनोद पाटील यांच्या पथकाने केली. पुढील तपास मनोज संबोधी करीत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!