डनलेचा येथे शेतीच्या वादातून एकाचा खून

0
नंदुरबार । अक्कलकुवा तालुक्यातील डनलेचा कुडीबारपाडा येथे शेतीच्या जुन्या वादातून एकाचा कुर्‍हाडीने मानेवर कुर्‍हाडीने हल्ला करून खून केल्याची घटना घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील डनलेचा कुडीबारपाडा गावात शेतीच्या जुन्या वादातून कुरापत काढून कुंमजी देवजी पाडवी रा.डनलेचा कुरीबारपाडा (ता.अक्कलकुवा) याने शिवीगाळ करून हातातील कुर्‍हाडीने खुमा बामण्या वळवी (35) रा. डनलेचा कुरीबारपाडा ता.अक्कलकुवा याच्या मानेवर जिवेठार मारण्याचा उद्देशाने वार करून ठार केले व फिर्यादी सोडण्यास गेला असता त्याच्या डोक्यावर दगड मारून दुखापत केली. म्हणून सोन्या बामण्या वळवी याने दिलेल्या फिर्यादीवरून कुमजी देवजी पाडवी याच्याविरूध्द मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*