डामखेडा येथील लाचखोर मुख्याध्यापक गजाआड

500 रुपये घेतांना झाली कारवाई

0

नंदुरबार । शाळेच्या वार्षिक तपासणीसाठी असलेल्या शेरे बुकात चांगला शेरा मारून चुका न काढण्यासाठी 500 रूपयांची लाच स्विकारणार्‍या मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नंदुरबार येथे रंगेहाथ अटक केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील शिक्षकाची पत्नी डामरखेडा येथे कार्यरत आहे. त्यांच्या शाळेची वार्षिक तपासणी असलेल्या शेरे बुकात कुठलीही त्रुटी न काढण्यासाठी मुख्याध्यापक मोरसिंग सोनू राठोड यांनी 500 रूपयाची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार येथे लेखी तक्रार दिल्याने आज रोजी मुख्याध्यापक मोरसिंग राठोड यांना लाच घेतांना दंडपाणेश्वर मंदिर परिसरात असलेल्या रसवंती गृहाजवळ ताब्यात घेण्यात आले.

सदर कारवाई उप अधिक्षक शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता पाटील, पोलीस निरीक्षक करूणाशील तायडे, पोहेकॉ उत्तम महाजन, संजय गुमाने, पोलीस नाईक दिपक चित्ते, पोना संदिप नावाडेकर, पोना अमोल मराठे, मनोज अहिरे, मनोहर बोरसे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

*