Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारमुलबाळ होत नसल्याने महिलेला फवारणीचे औषध पाजले

मुलबाळ होत नसल्याने महिलेला फवारणीचे औषध पाजले

नंदुरबार – NANDURBAR – प्रतिनिधी :

मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुन महिलेला फवारणीचे औषध पाजून जीवेठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना

- Advertisement -

तालुक्यातील नगाव येथे घडली. याप्रकरणी तिच्या पतीसह सात जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नगाव येथील मनिषा दिलीप सूर्यवंशी (22) या महिलेला मुलबाळ होत नाही या कारणावरुन दिलीप वेडू सूर्यवंशी, वेडू महारु सूर्यवंशी, कमलाबाई वेडू सूर्यवंशी, कृष्णा वेडू सूर्यवंशी, ज्योती कृष्णा सूर्यवंशी, अशोक वेडू सूर्यवंशी, सुरेखा वेडू सूर्यवंशी (सर्व रा.नगाव, ता.नंदुरबार) यांनी दि.26 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 संगनमत करुन नगाव येथील कमलबाई सूर्यवंशी यांच्या शेतात मनिषा हिचे हातपाय धरुन पिकावर फवारणीचे औषध पाजून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. तिला नंदुरबार येथील शिंदे हॉस्पीटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यानंतर दि.27 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथून धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. धुळे येथे तिचा जबाब नोंदविण्यात आला.

त्यानुसार आज तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध भादंवि कलम 307, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या