Sunday, May 5, 2024
Homeनंदुरबारपोलीसांना खोटे नाव सांगून खर्‍या आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा

पोलीसांना खोटे नाव सांगून खर्‍या आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

दारुच्या गुन्हयातील खर्‍या आरोपीला वाचविण्यासाठी पोलीसांना खोटे नाव सांगून पोलीसांची दिशाभूल केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसावद पोलीसठाण्यात भादंवि कलम 28, 34 सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ख) (घ) (ई) (फ) या गुन्हयात कालुसिंग खुमानसिंग पावरा यास अटक करण्यात आली होती.

तपासादरम्यान त्याला दारु बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल कोठून आणतो याबाबत विचारपूस केली असता त्याने मलगाव येथील राहणारा शहाणा जगन ढिवरे याचे नाव सांगून त्याच्या राहत्या घरी पेालीसांना घेवून गेला.

शहाणा ढिवरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले, हा इसम कालुसिंग नाही, त्याच्या नाव भावाचे नाव कालुसिंग आहे, याचे नाव रमेश खुमानसिंग पावरा असे असून दोघा भावांना मी ओळखतो, असे सांगितले.

अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले, आरोपी बेहरमसिंग दिवल्या पावरा रा.कुंडया, रुमलाल, कुवरसिंग, मेहमल, खुनश्या रा.सिंदीदिगर यांनी कालुसिंग यास सांगितले, तु गुन्हा तुझ्या अंगावर घे, तुच कालुसिंग असल्याचे पोलीसांना सांग आणि आम्हीसुद्धा तुच कालुसिंग असल्याचे सांगू.

असे सांगितल्याने आरोपी रमेश खुमानसिंग याने पोलीसांना आपले नाव कालुसिंग असल्याचे खोटे सांगून खर्‍या आरोपीला अटकेपासून वाचविण्याचा व अपराध्यास कायदेशीर शिक्षेपासून वाचविण्यासाठी पोलीसांना खोटी माहिती दिली म्हणून, वरील सहा जणांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ भिमसिंग ठाकरे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या