Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारपतंग उडविण्याच्या वादातून दंगल

पतंग उडविण्याच्या वादातून दंगल

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

शहरातील जुना बैल बाजार परिसरात पतंग उडविण्याच्या कारणावरुन वाद होवून दोन गटात दंगल झाली.

- Advertisement -

यात 60 वर्षीय इसमाचा खून झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दि. 12 सप्टेंबर रोजी शहरातील जुना बैल बाजार परिसरात शाहरुख शेख कलीम पटवे, नईम शेख कालीम पटवे, समीर शेख कलीम पटवे, अल्लमश शेख कलीम पटवे, मोहसिन कलीम पटवे, अलीशानबानो शेख कासम पटवे, नाजीम शेख कलीम पटवे, अत्तार शेख सलमान शेख मन्नान, शेख सलीम अबुल हसन ऊर्फ मुन्ना इसाक पटवे, कलीम पटवे, सना फिरोज पटवे, शेख नुशरतबानो शेख सलीम ऊर्फ मुन्ना पटवे (सर्व रा. लक्कड़कोट, जुना बैल बाजार अलीसाहब मोहल्ला, नंदुरबार. ता जि नंदुरबार) यांनी पतंग उडविण्याच्या कारणावरुन झालेल्या वादाची कुरापत काढून लियाकत शाहिद बागवान यांच्या घरावर दगडफेक करुन लाठयाकाठया, लोखंडी पाईप घेवून घरात प्रवेश करुन त्यांना बाहेर ओढत अंगणात आणले. तसेच लाठयाकाठयांनी मारहाण केली.

बागवान यांचे मामा हारुन युसूफ कुरेशी यांना अल्तमश, कलिम, नईम, समीर, मोहसीन, मुन्ना यांनी धक्काबुक्की करुन जमिनीवर पाडले व बाजुलाच असलेला दगड उचलून हारुन कुरेशी याच्या छातीवर मारल्यामुळे बेशुद्ध पडले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

यावेळी अंगणात उभ्या असलेल्या अ‍ॅक्टीवा व बुलेट यांची तोडफोड करुन नुकसान करण्यात आले. तसेच शिवीगाळ करुन लियाकत शाहिद बागवान यांना शिवीगाळ करुन जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली.

याप्रकरणी बारा जणांविरुद्ध भादंवि कलम 302, 307, 324, 452, 427, 143, 147, 148, 141, 323, 504, 506, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 3711)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अरबाज, समीर, युनूस, लियाकत बागवान, हारुणची पत्नी, हारुणची बहिण, अज्ञात मुलगा यांनी पतंग उडविण्याच्या कारणावरुन शेख कलिम शेख कासम पटवे यांच्या राहत्या घरात घुसून अरबाज व समीर यांनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने डोक्यात मारहाण करुन दुखापत केली.

तसेच त्यांचा मुलगा मौसिक यास युनूस व अज्ञात मुलाने कपाळावर हातातील लोखंडी पाईपने मारुन जीवघेणा हल्ला केला. हारुणची पत्नी व बहिण यांनी शेख कलीमच्या पत्नीस हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच लियाकत बागवान याने भडकावून शेख कलीम, त्याची पत्नी व मुलाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला केला. यात शेख कलीम व मौसिम कलीम पटले हे जखमी झाले आहेत. याबाबत सात जणांविरुद्ध भादंवि कलम 307, 452, 324, 323, 143, 147, 148, 149, 109, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या