नंदुरबार । महाराष्ट्रातील औरंगाबाद, अहमदनगर,पुणे, नाशिक ग्रामिण जिल्हयातील खुनासह दरोडा टाकणारी टोळीला पकडण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असुन त्यांच्या कडुन दरोड्या टाकण्याचे विवीध साहित्य जप्त करण्यात आले आहे.तीघा आरोपींना दि.27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल दि.23 मार्च रोजी नंदुरबार शहरात रात्री साडेदहाचे सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना 5 ते 6 इसम साक्रीरोडवरील भाऊ पेट्रोलपंप भागात हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीने फिरत असल्याची बातमी मिळाली.पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथकासह भाऊ पेट्रोलपंपाच्या परिसरात दाखल होऊन शोध मोहीम सुरु केली. तेथून जवळच असलेल्या राजेंद्र फार्म हाऊसच्या परिसरात सुमारे 70 ते 80 मीटर अंतरावर आतमध्ये एका बंद बंगल्याचे आडोश्याला सदर गुन्हेगार दबा धरुन लपून बसल्याचे असल्याचे दिसून आले.पथकाने या बंगल्याजवळ सापळा लावून कारवाई केली.त्यात 6 इसमांपैकी 3 इसमांना ताब्यात घेण्यात यश प्राप्त झाले.इतर 3 इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.ताब्यात घेतलेल्या गोट्या बंड्या काळे, रा.रासेन ता.कर्जत( जि.अहमदनगर), सायराफ उर्फ साईराम जाना काळे, विक्की पावश्या चव्हाण दोन्ही रा.शेकटा ता. गंगापुर (जि. औरंगाबाद), अशा तिन्ही इसमांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मिरचीपूड, सुती दोर,14 इंची लांब धारदार सुरा, 44 इंच लांब लोखंडी टॅमी व 1 करवतपट्टी ,लोखंडी गज अशी दरोडा टाकण्यासाठीचे साधने मिळुन आली.

त्यामुळे त्यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 399 व भारतीय हत्यार कायदा 4/25 प्रमाणे दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपी हे कुख्यात दरोडेखोर गुन्हा करते वेळी प्रतिकार करणार्‍या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करतात. वेळ प्रसंगी पोलीस पकडण्यासाठी, अटक करण्यासाठी गेल्यावर पोलीसांवर देखील प्राणघातक हल्ला करण्यास ते घाबरत नाहीत. सदर दरोडेखोर यांना जेरबंद केल्याने जिल्हयात दरोडा खुन सारखे गंभीर गुन्हा प्रतिबंध करण्यात नंदुरबार पोलीस दलाला यश मिळाले आहे.गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी या गुन्ह्याचे तपासासाठी 2 विशेष तपास पथक तयार केले आहेत.

सदर गुन्हेगार हे आतंरजिल्हा दरोडेखोरे आहेत. त्यांच्या पुर्वइतिहासाची माहिती काढ़ली असता गोट्या बंड्या काळे व सायराफ उर्फ साईराम जाना काळे हे दोन्ही अत्यंत कुख्यात व निर्दयी दरोडेखोर असल्याचे दिसून आले आहे. गोट्या काळे याच्या वर पुणे व अहमदनगर जिल्ह्यात खुन 1, दरोडा 2,जबरी चोरी 1 व घरफोडीचे 3 गुन्हे दाखल असुन दौंड पोलीस ठाण्यात (पुणे ग्रामिण) मोक्का अन्वये कारवाई झाली असुन तेथुन तो फरार आहे. सायराफ उर्फ साईराम काळे याच्यावर नाशिक ग्रामिण जिल्ह्यात निफाड, नांदगाव, पिपंळगाव, येवला तालुका व जायखेडा या पोलीस ठाण्यांमध्ये खुनासह दरोडा 2,दुखापतीसह दरोडा 3.दुखापतीसह जबरी चोरी 2 व चोरीचा 1 असे एकूण 17 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच यातील काही गुन्ह्यांमध्ये ते फरार देखील आहेत.सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोहेकॉ विकास पाटील, दिपक गोरे, प्रदिप राजपुत, योगेश सोनवणे, रविंद्र पाडवी, विनोद जाधव, पोना प्रमोद सोनवणे, विकास अजगे, भटु धनगर, संदिप लांडगे, महेंद्र सोनवणे, राकेश मोरे, किरण मोरे पोशिआनंदा मराठे,अभय राजपुत,सतिष गुले यांनी बजावली असुन मा. पोलीस अधीक्षक यांनी तपास पथकाचे अभिनंदन करुन रोख बक्षीस व सन्मानपत्र जाहीर केले आहे.

तीन आरोपी फरार
पोलिसांनी तीन दरोडेखोरांना अटक केली. तर तीन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. दरम्यान दरोडेखोरांकडून शस्त्र हस्तगत केले. दरोडेखोरांवर आत्तापर्यंत राज्यभरात 17 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

LEAVE A REPLY

*