मोटारसायकलस्वाराला अडवून सव्वा दोन लाख लांबविले

0
नंदुरबार । नवापूर ते पिंपळनेर दरम्यान चरणमाळ घाटात तीन मोटरसायकल स्वारांनी मोटारसायकलस्वारास अडवून दूध उत्पादक डेअरीचे दोन लाख 27 हजार पाचशे रुपये बळजबरीने लांबविल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.12 मार्च दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावरील चरणमाळ घाटात गुलाब छगन मावची रा. रायवनपाडा,चरणमाळ,ता. साक्री हे आपल्या युनिकॉन मोटरसायकलने जात असतांना चरणमाळ येथे सहकारी दूध उत्पादन डेअरी चे पैसे घेऊन जात असतांना अज्ञात तीन इसमांनी मोटरसायकलचा पाठीमागे येऊन त्यांच्या जवळील दोन लाख 27 हजार पाचशे रुपये रोख बळजबरीने हिसकावून नवापुर कडे निघून गेले.

याबाबत गुलाब छगन मावशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन इसमाविरुद्ध नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि डी.डी.पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

*