Type to search

नंदुरबार

युवकाचा खून प्रकरणी पत्नी व सासू सासर्‍यांना अटक

Share
श्रीगोंदा: अजनूजमध्ये दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपी अद्याप फरार, Latest News Shrigonda Ajnuj Try Kill

नंदुरबार| प्रतिनिधी- 

तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे पत्नीला घ्यायला आलेल्या पतीस मारहाण करून खून केल्याप्रकरणी पत्नी, सासू, सासर्‍यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील गडी कोठडा येथे राहणार्‍या सुरेश गुलाबसिंग वळवी (२८) याची पत्नी वंदनाबाई सुरेश वळवी ही चिनोदा येथे माहेरी गेली असता ती नांदायला येत नाही. तिला घ्यायला वेळोवेळी चिनोदा येथे जात होता. त्याचा राग आल्याने त्याच्या पत्नीसह सासू सासर्‍यांनी हाताबुक्यांनी व डोक्यावर काठीने मारहाण केली.

या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुलाबसिंग बोंडा वळवी रा. गडीकोठडा (ता.तळोदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात जंग्या मोग्या नाईक, शांताबाई जंगा नाईक, वंदनाबाई सुरेश वळवी सर्व रा. चिनोदा ता.तळोदा यांच्या विरूध्द भादंवि क ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नीसह सासू, सासर्‍यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोसई पाकळे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!