नंदुरबारात तरुणाचा दगडाने ठेचून खून

नंदुरबारात तरुणाचा दगडाने ठेचून खून

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

शहराबाहेरील उड्डाणपुलाजवळ 35 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील उड्डाणपुलाजवळील जगताप वाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरील श्री तुळजाभवानी किराणा दुकानासमोर अज्ञात इसमाने राकेश दिवाण खर्डे (वय 35, रा.आडगाव ता.शहादा) या युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौधरी घटनास्थळी दाखल झाले. युवकास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.सांगवीकर यांनी त्यास मयत घोषीत केले.

पोलिसांनी यावेळी श्वान पथकासह पोलिस पथकाने मारेकर्‍याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मारेकरी फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सुमारे 15 किलो वजनाचा दगड जप्त केला आहे.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक सुरेश बाबुलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com