Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारनंदुरबारात ट्रकमध्ये म्हशी कोंबून वाहतूक

नंदुरबारात ट्रकमध्ये म्हशी कोंबून वाहतूक

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

कोणतीही सुरक्षितता न ठेवता ट्रकमध्ये 17 म्हशी कोंबून वाहतूक करतांना आढळल्याने गुजरात येथील एका इसमाविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

त्याच्याकडून 4 लाख 5 हजार रुपये किमतीच्या म्हशी व 12 लाख रुपयांचा ट्रक असा एकुण 16 लाख 5 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरुच (गुजरात) येथील शब्बीर इब्राहीम पठाण हा त्याच्या ताब्यातील मालट्रक (क्र.जीजे 31-टी 1816) मध्ये 17 म्हशी कोंबून व त्यांना वेदना होईल, अशा पद्धतीने बांधून वाहतूक करतांना आढळून आला.

नंदुरबार शहरातील नवापूर चौफुलीजवळ सदर वाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी सदर ट्रक ताब्यात घेतले. त्याच्यात कोणतीही सुरक्षितता न बाळगता 17 म्हशी काेंंबण्यात आल्या होत्या व त्यांना वेदना होतील, अशा पद्धतीने बांधण्यात आल्या होत्या.

या म्हशींची किंमत 4 लाख 5 हजार असून 12 लाखांचा ट्रक असा एकुण 16 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.

याप्रकरणी चालक पोलीस नाईक सादीकखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शब्बीर पठाण याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.पी.सोनवणे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या