Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारचार लाखाच्या गांजासह दोघांना अटक

चार लाखाच्या गांजासह दोघांना अटक

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

धडगांव येथुन शहादाकडे चारचाकी वाहनाने सुका गांजाची वाहतुक करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असुन त्यांच्या ताब्यातुन 4 लाख 27 हजार रुपये किमतीचा गांजासह एकुण 9 लाख 27 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, धडगांव येथुन शहादाकडे महिंद्रा मॅक्स चारचाकी वाहनाने अमली पदार्थ सुका गांजाची वाहतुक होणार आहे.

अशी बातमी मिळाल्याने,स्थानिक गुन्हे अन्वे. शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत व पथकाने दि.22 डिसेंबर रोजी रात्री शहादा तालुक्यातील दरा फाट्यावर वाहन उभे करुन धडगांवकडून येणार्‍या वाहनांचे निरिक्षण करीत थांबलेले असतांना रात्री 8.30 वाजेच्या सुमारास धडगांव गावाकडून एक महिंद्रा चारचाकी गाडी वेगाने येतांना दिसुन आल्याने,

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचार्‍यांनी हाताने व बॅटरीच्या सहायाने वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता संशयीत वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेला म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची खात्री झाल्याने सदर वाहनाचा पाठलाग करुन वाहनाला थांबवुन वाहनामध्ये असलेल्या पोप्या डेमच्या पावरा रा. धडगांव पिंप्री ता.धडगांव ,विनोद भगवान चव्हाण रा. वडफळ्या ता. धडगांव यांना कोठुन आले व कोठे चालले,

गाडीमध्ये काय माल भरला आहे याची माहिती विचारली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देवुनखोटे बोलत असल्याचे निदर्शनास आले, परंतु त्यांना पोलीसी खाक्या दाखवुन वाहनांची तपासणी केली असता त्यात प्लास्टीकचे गोण्या दिसल्याने त्यांना उघडुन पाहिले असता त्यात अमलीपदार्थ सुका गांजा मिळुन आला.

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयीत इसम व महिंद्रा मॅक्स गाडीच्या मागील जागेत ठेवलेले 4 लाख 27 हजार 945 रुपये किमतीचा 61 किलो 135 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा पानबीया व कळ्यांचा चुरा अंबुस वास असलेला अमली पदार्थ सुका गांजा, 5 लाख रुपये किमतीची एक चारचाकी (क्र.एम.एच.39-0913) असा एकुण 9 लाख 27 हजार 945 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोना जितेंद्र सुभाष अहिरराव यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात पोप्या डेमच्या पावरा रा.धडगांव पिंपरी (ता.धडगांव), विनोद भगवान चव्हाण रा.धडगांव वडफळया (ता.धडगांव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे. शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोना जितेंद्र अहिरराव, विशाल नागरे, बापु बागुल यांचे पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या