Tuesday, April 23, 2024
Homeनंदुरबारनंदुरबारात पावणे पाच लाखाचे मोबाईल जप्त

नंदुरबारात पावणे पाच लाखाचे मोबाईल जप्त

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नंदुरबार शहरात मोबाईलचे दुकान फोडून महागडे मोबाईल चोरी करणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 4 लाख 70 हजार रुपये किमतीचे 56 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.3 डिसेंबर 2020 रोजी रात्री काही अज्ञात चोरट्यांनी नंदुरबार शहरातील नवशक्ती शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये संजय मोबाईल शॉपी फोडून महागडे मोबाईल चोरून नेले होते.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे तपास सुरु असतांना सदर दुकानफोडी ही नंदुरबार शहरात राहणारे 2 विधिसंघर्ष बालकांनी केली असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना गुप्त बतमीदारामार्फत मिळाली.

त्यानुसार सदर बालकांना ताब्यात घेऊन, तसेच विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, सदरचा गुन्ह्याची कबुली दिली तसेच लपवलेला 4 लाख 70 हजार रुपये किमतीचे 56 महागडे मोबाईल काढून दिले.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पोनी विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोहेकॉ प्रमोद सोनवणे,पोना/राकेश मोरे, दादाभाई मासूळ, पोशी अभय राजपूत, आनंद मराठे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या