मध्य प्रदेश बनावटीचा पाच लाखांचा मद्यसाठा जप्त

0

नंदुरबार । अक्कलकुवा शहरातील मोलगी फाटयावर मध्यप्रदेश बनावटीचे 5 लाखांचे मद्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

अक्कलकुवा तालुका हा गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेला तालुका आहे. मध्य प्रदेशातून बनावट मद्य याच मागाने पुढे गुजरात राज्यात पाठवले जाते. अक्कलकुवा येथील पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सापळा रचण्यात आला.

अवैधरित्या मद्याने भरलेले बोलेरो वाहन सकाळी सात वाजेच्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, यशवंत वसावे, पो.कॉ. मुकेश तावडे, गुलाब जोहरी, सुनिल पाडवी, कन्हैया परदेशी यांनी अडवून तपासणी केली असता मद्यसाठा दिसून आला. तयात किंगफिशर बिअरचे 38 हजार 760 रूपयांचे 17 खोके, बॉम्बे स्पेशल विस्कीचे 3 लाख 34 हजार 560 रूपयांचे 32 खोके, किंगफिशर बियर टिनचे 1 लाख 79 हजार रूपयांचे 32 खोके, इंपेरिअल ब्ल्यु व्हिस्कीचे 20 हजार 160 रूपयांचे 3 खोके व पाच लाख रूपयांचे महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप वाहन (क्र.एम.पी.46- जी.1672)10 लाख 12 हजार 520 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदा क.65 इ.65 अ व 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोना सुनिल पाडवी यांच्या फिर्यादीवरून सादिक अनवर शह वैतागवाडी, खेतीया (ता.पानसेमल जि.बडवानी) याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत करीत आहेत.

LEAVE A REPLY

*