नंदुरबार । चांदसैली घाटात भाविकांची जीपगाडी उलटल्याने दहा प्रवाशी जखमी झाले. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील रंजनपूर येथे संत गुलाम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेवून धडगांव येथे परतत असतांना चांदसैली घाटात जीपगाडी उलटल्याने त्यातील प्रताप वळवी, भगतसिंग पाडवी, किसन वसावे, खेमजी वळवी, गणत्या पाडवी गुलाब पाडवी यांना देखापत झाली.
याबाबत भागीराम पाडवी रा. कुंदलचा महूपाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात चालक दावर्या टेटया पाडवी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.