Type to search

नंदुरबार

नोकरीचे आमिष दाखवून एकाची सहा लाखात फसवणूक

Share

नंदुरबार | संस्थत नोकरीचे आमिष दाखवून नंदुरबार तालुक्यातील घोगळपाडा येथील एकाचे ६ लाख २० हजार रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक येथील एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आसाराम बाजीराव गांगुर्डे यांचा मुलास संस्थेस नोकरी लावून देतो म्हणून त्यांच्याकडे ८ लाखाची मागणी केली असता. त्यांनी रविंद्र शांताराम बागुल याला ५ लाख २० हजार रूपये दिले. तसेच त्यांच्या भाजाच शिपाई म्हणून नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून ५ लाख रूपये द्यावे लागतील अशी मागणी करून अशोक खांडारे यांच्याकडून देखील एक लाख रूपये घेतले.

त्यानंतर देखील आत्माराम गांगुर्डे यांच्या मुलाला व भाजाचा नोकरी लावलेली नाही. म्हणून याबाबत दिलेल्या पैसाची मागणी केली असता त्यानी टाळाटाळ केली व अशोक खांडारे यांना त्याचा नावाचा एक लाख रूपयाचा ऍक्सीस बँकेचा धनादेश दिला तो वटला नाही. आसाराम गांगुर्डे व अशोक खांडारे यांच्याकडून ६ लाख २० हजार रूपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी आसाराम बाजीराव गांगुर्डे रा.घोगळपाडा ता.जि.नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार पोलीस ठाण्यात रविंद्र शांताराम बागुल रा. चिनार हाऊस सोसायटी इच्छामणी नगर नाशिक याचा विरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून  पुढील तपास पोसई बागल करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!