Type to search

Breaking News नंदुरबार मुख्य बातम्या

गुजरात पोलिसांकडून 28 लाखांची दारू, 15 लाखांची रोकड जप्त

Share

नंदुरबार । गुजरात राज्यात अवैधरीत्या दारूची तस्करी करणारे टँकर गुजरात पोलिसांनी जप्त केले आहे. या टँकरमध्ये 28 लाख 41 हजार 200 रुपयांची दारू, 15 लाख 13 हजार 870 रुपयांची रोकड असा एकूण 43 लाख 55 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी नवापूर येथील एका नगरसेवकासह पाच जणांविरुद्ध गुजरात राज्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन संशयित नवापूरचे असून त्यापैकी चालकाला अटक करण्यात आली आहे. उर्वरित चारही संशयित फरार आहेत.

याबाबत गुजरात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून गुजरात राज्यात टँकरद्वारे अवैधरीत्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली. त्यानुषंगाने पोलिसांनी सापळा रचून नवापूर परिसरातून दारूने भरलेला टँकर (एम.एच.05, के-8767) आनंद जिल्ह्यातील वासदहून डाकोर रस्त्यावरून जात असताना महामार्गावर फ्रेंड्स राजस्थानी दालबाटी हॉटेलच्या पार्किंगदरम्यान 25 रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास पकडला. अहमदाबाद पोलिसांनी टँकर तपासणी केली असता त्यात दारूचा अवैध साठा आढळून आला.

त्यात भारतीय बनावटीची विदेशी दारू, लहान-मोठ्या 7 हजार 138 बॉटल्स आढळून आल्या. या दारूची एकूण किंमत 28 लाख 41 हजार 200 असून 15 लाख 13 हजार 870 रुपयांची रोकड, 500 रुपयांचा मोबाईल असा एकूण 43 लाख 55 हजार 570 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत रितेश प्रभात चौधरी (रा.देवगड गाव, टेकरीफळीया ता.मांडवी जि.सुरत) या चालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नवापूर येथील नगरसेवक विश्वास भीमराव बडोगे (रा. देवलफळी नवापूर), कमलेश मिठालाल खत्री (मारवाडी) रा.नवापूर, नितीन पाटील (रा.नवापूर), संजय अशोक देवरे (रा.नवसारी) यांच्याविरुद्ध गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील चार संशयित फरार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!