नंदुरबार येथे 24 वर्षीय वकिल तरुणीला डांबून ठेवून बलात्कार

0
नंदुरबार । जुने धडगांव येथील 24 वर्षीय वकील असलेल्या तरुणीला डांबून ठेवून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी चार जणांविरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने धडगांव येथे वकीली करणार्‍या 24 वर्षीय युवतीला खोटे बोलून नंदुरबार येथील नवजीवन लॉज व धडगांव येथील कुसूमवेरी येथे घेवून जावून तिच्या वडीलांची बदनामीची भिती दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला व 18 सप्टेंबर 2018 ते 25 जानेवारी 2019 पर्यंत डांबून ठेवले.

याप्रकरणी पिडीत युवतीच्या फिर्यादीवरून विपुल मोना वळवी व त्याचे आई, वडील व भाऊ सर्व रा. शासकीय मुलाचे वस्तीगृह बिल्डींग क्र. 2 पटेलवाडी यांच्याविरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई दहिफळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*