Type to search

मागील भांडणाच्या वादातून एकावर तलवारीने हल्ला

maharashtra नंदुरबार

मागील भांडणाच्या वादातून एकावर तलवारीने हल्ला

Share
नंदुरबार । नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे येथे मागील भांडणाचा वादावरून हळदीचा दिवशी एकास तलवारीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाव दगेसिंग गिरासे रा.शेवाडे ता.शिंदखेडा हे ढंढाणे गावात शालकाचा हळदीचा कार्यक्रमात नाचत असतांना आरोपी यांनी मागील भानडाचा वादातून धार्‍याने, तलवारीने डोक्यावर पाठीवर वार केला व इतर आरोपीतांनी लोखंडी सळीने मारहाण करून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. व त्यांचा हातातील सहा हजार रूपये किंमतीचे चांदीचे ब्रेसलेट व रोख रूपये जबरीने हिसकावून घेतले.

याप्रकरणी प्रताप गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात राजू भारतसिंग गिरासे, पावबा भारतसिंग गिरासे, भारतसिंग आनंदा गिरासे, उषाबाई भारतसिंग गिरासे, निलेश नाना गिरासे, जयपाल रूपसिंग गिरासे सर्व रा. ढंढाणे ता.नंदुरबार यांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जी.टी.पवार करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!