फोटो सोशल मिडियावर प्रसारीत करण्याची धमकी देवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
नंदुरबार । नंदुरबार शहरातील गणपती नगरमध्ये राहणार्‍या अल्पवयीन युवतीचे इंस्टाग्राम अकाऊंटचे पासवर्ड बदलून फोटो प्रसारीत करण्याची धमकी देवून अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील गणपती नगर येथे राहणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे जुनी सिंधी कॉलनी येथे राहणार्‍या रोहित लालचंद रोहडा याने इंस्टाग्राम अकाऊंटचे पासवर्ड बदलले व पिडीत मुलीला नकळत काढलेले फोटो प्रसारीत करून समाजात बदनामी करेल अशी धमकी दिली.

तिच्या घरी जावून तिच्या इच्छेविरूध्द अत्याचार केल्याप्रकरणी पिडीतेचा फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात रोहित लालचंद रोहडा याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई रूपाली महाजन करीत आहेत.

LEAVE A REPLY

*