जिल्हयात 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बागायती कापसाची लागवड

0
शहादा । ता.प्र.-जिल्ह्यातील विविध भागात तब्बल 10 हजार हेक्टर बागायती कापसाची लागवड झाली आहे. तर काही भागात 10 जून रोजी झालेल्या पावसावर कोरडवाहू शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली आहे.
तर काहींनी धूळपेरणी केली आहे . कापूस पीक वाचवण्यासाठी शेतकर्‍याची धडपड आता चुहा पद्धतीने सुरु झाली आहे.
जिल्ह्यात 10 जून रोजी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली त्या नंतर कापसाचे अंकुर बाहेर पडलेत.
काही शेतकर्‍यांनी बागायती कापसाची लागवड केली होती. मात्र, पावसाने तब्ब्ल दहा दिवसापासून दांडी मारल्याने पीक जगवण्याचे मोठे आव्हान शेतकर्‍यांसमोर उभे आहे.

त्यासाठी आता शेतकरी मजूर लावून चुव्वा पद्धतीने कापसाला पाणी देऊन आपलं पीक जगविण्याचा अहोरात्र कसून प्रयत्न करीत आहेत.

जिल्ह्यात तापी नदी सोडली तर सार्‍याच नद्या कोरड्या झाल्या आहेत. जिह्यातील अनेक धरणानं मध्ये फक्त गाळच उरला आहे. तर अनेक विंधन विहिरिंची जल पातळी पाचशे ते सहाशेपेक्षा जास्त फूट खाली गेली असल्याचे बोलले जात आहे.

बागायत दार शेतकर्‍यांनी मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात कापसाची लागवड केली होती. मात्र आता भूजल पातळी खालावल्याने पाणी देण्यात अनेक अडचणी येत आहे.

अनेक शेतकर्‍यांच्या विंधन विहिरींना तोडके पाणी असले तरी अत्यंत दुष्काळात तेरावा महिना म्हणावं तसं लोडशेडिंगचे भूत शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसल्याने कापसाचे पीक वाचविण्यासाठी शेतकरी तारेवरची कसरत करीत आहे.

कापसाच्या पिकाची पहिल्या पावसानंतर शेतकर्‍यांनी लागवड केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांनी या पिकाला चुव्वा पद्धतीने पाणी द्यावे तसेच ज्या शेतकर्‍याची कापूस लागवड बाकी असेल त्यांनी घाई करू नये जिरायती कापूस लागवड जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यत करता येते.

त्यामुळे घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. वरुणराज्याने पाठ फिरवली असल्याने शेतकर्‍यांना चुहा पद्धतीने पाणि पुरविण्यासह दुबार पेरणीचे संकट आले आहे.

कापसाचे पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍याची धडपड सुरु आहे. तो आपल्या रक्ताचे पाणी करून पीक जागवण्याचा प्रयत्न करीत आहे.

त्याच सोबत विठू माउलीला साकडे घालत नको देऊ सोन्या चांदीचे दान रे, भिजव आता माझं तान्हलेलं रानरे, अशी आर्त हाक मारताना सद्या शेतकरी दिसून येत आहे.

 

LEAVE A REPLY

*