जिल्ह्यातील सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची आढावा बैठक

0
नंदुरबार । प्रतिनिधी-सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था तसेच सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्या सूचनेवरून नंदुरबार येथे आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी शासन निर्णयाचे वाचन करण्यात येवून बैठकीला अनुपस्थित लेखापरिक्षकांना नोटीस बजावण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.
या सभेदरम्यान सन 2016-17 मध्ये ठरावान्वये नंदुरबार जिल्ह्यातील एकूण संस्थांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील 770 सहकारी संस्थांपैकी 81 सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण पूर्ण झाले असून 689 संस्थांचे लेखापरिक्षण होणे बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यापैकी 536 सरकारी संस्थांनी दोषी दुरूस्ती अहवाल सादर केला असून 234 सहकारी संस्थांनी अद्यापही तसा अहवाल सादर केलेला नाही.

नंदुरबार तालुक्यातील 266 पैकी 37 संस्थांचे लेखापरिक्षण पूर्ण झाले असून 229 संस्थांचे लेखापरिक्षण बाकी आहे. शहादा तालुक्यातील 256 पैकी 10, तळोदा तालुक्यातील 85 पैकी 15, अक्कलकुवा तालुक्यातील 31 पैकी 5 नवापूर तालुक्यातील 95 पैकी 11, धडगांव तालुक्यातील 36 पैकी 3 संस्थांचे पूर्ण झाले आहेत.

सभेदरम्यान उपस्थित असलेल्या लेखापरिक्षकांशी चर्चा करतांना लेखा परिक्षणात येणार्‍या अडचणी मांडल्यानंतर लेखा परिक्षण अहवाल संस्थेस व विशेष लेखापरिक्षक कार्यालयास जुलै अखेरपर्यंत सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. नंदुरबार जिल्ह्यातील खात्याचे, सनदी व प्रमाणित लेखापरिक्षक यांची पुढील आढावा बैठक 20 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*