खलघाट येथे हजारो शेतकर्‍यांच्या उपस्थित काँग्रेसची महापंचायत

0
खेतिया । ता.पानसेमल । दि.27 । वार्ताहर-खलघाट राष्ट्रीय महामार्गावर धार येथे शेतकरीचे जेलभरो आंदोलनात हजारो शेतकर्‍यांच्या उपस्थित काँग्रेसची महा पंचायत झाली.
यावेळी माजीमंत्री ज्योतीराजे सिधीया, माजीमंत्री कमलनाथ, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, सुरेश पंचोरी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरूण यादव, आ. सचिन यादव, आ.बाला बच्चन, माजीमंत्री डॉ.विजया लक्ष्मी, विरोध पक्षनेते अजयसिंह, खा.कांतीलाल भुरीया, शोभा ओझा, आ.उमंग सिंगार आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकार शेतकरीचे कर्जमाफ करीत ननाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असे प्रदेशाध्यक्ष अरूण यादव यांनी सांगितले. माजी मंत्री ज्योतीराजे सिंधीया यांनी मध्यप्रदेशचा भाजप सरकारचा धिक्कार केला.

शेतकर्‍यांना सरकार दिशाभूल करीत आहे. शेतकरीचे मंदरसौर येथील आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकर्‍याना आंदोलन स्थळी श्रध्दांजली वाहण्यात आली.

प्रदेश अध्यक्ष अरूण यादव, आ.सचिन यादव आदींनी नर्मदा नदीचे पुजन करून आंदोलनाला सुरूवात केली. खंडवा, इंदौर आदी परिसरातील हजारो संख्येने शेतकरी उपस्थित होते.

शेतकरींचे कर्जमाफी, शेतकरींना शेतीमाफक समर्थन मुल्यावर खरेदी करावी त्यासाठी हे आंदोलन करण्यात आली. जोपर्यंत शेतकरीचे कर्जमाफ होता नाही तोपर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुका स्तरावर हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

याआदी शेतकरी नेते सुभाष यादव यांनी ही शेतकरींचा आवाज सरकारपर्यंत पोहचवावा त्यासाठी खलघाट येथे असेच आंदोलन सन 1999 झाली केले होते.

त्योवळी सरकार शेतकरींचा मागण्या मान्य होण्यासाठी जेल भरो आंदोलनात हजारो काँग्रेसी शेतकरींनी अटक करण्यात आली.

धार जिल्ह्याचे एसडीएम जितेंद्रसिंह चौहान यांनी आंदोलनाचा सभा स्थळी पंडाकला अस्थायी जेल मानून अटक करण्याची घोषणा केली व लगेच सुटका करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*