छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

0
नंदुरबार । प्रतिनिधी-शेतकरी पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांवर अवलंबून असतात.
या बँकांमार्फत दिल्या जाणार्‍या पीक कर्जासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकर्‍यांना व्याज सवलतीच्या योजना राबविण्यात येतात.
त्यामुळे या शेतकर्‍यांना पीक कर्ज शुन्य टक्के किंवा सवलतीच्या दराने उपलब्ध होवून त्यांची मुदतीत परतफेड करण्यात मदत होते.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने शासन निर्णय पारीत झाला असून या शासन निर्णयाबाबत जिल्ह्यातील बँकेचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलविण्यात आली. यावेळी शासन निर्णयाचे जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी यांनी वाचन केले.

या शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व बँकांनी करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक एस.के. नागरे यांनी प्रधानमंत्री पीक योजनेचे वाचन केले. जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी बँकनिहास उपस्थितांचा आढावा घेतला असता ज्या बँकांचे प्रतिनिधी या सभेला अनुपस्थित होते.

त्यांना नोटीसा काढण्याच्या सुचना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक संजय धामणकर यांना दिल्या आहेत.

या सभेला एस.वाय.पुरी, एस.के.नागरे, डॉ.अजित धोरबोले, उपविभागीय अधिकारी डॉ.अमोल कांबळे, नाबार्डचे व्यवस्थापक राजेश चांदेशकर, प्रशांत पराते, प्रशांत वराडकर, डी.बी. पवार, एन.एम. शिंदे, संदीप वळवी, सचिन शिंदे, एम.के. सिन्हा, जे.के. जैन, दिनेश गुरव, तुषार बैसाणे, खंडू पानपाटील आदी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*