Type to search

नंदुरबार

सहयोग सोशल गृप व नैवेद्य फाऊंडेशनतर्फे 60 वृद्धांची आरोग्य तपासणी

Share

चिनोदा, ता.तळोदा । वार्ताहर – तळोदा येथील सहयोग सोशल ग्रुप व नैवेद्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीचे औचित्य साधत तळोदा शहरातील निराधार, ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे अशा 60 वृद्धांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी वृद्धांची तपासणी करत त्यांना आजारानुरुप औषधी सुध्दा देण्यात आली. सहयोग सोशल ग्रुपच्या या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

ज्यांच्या नशिबी दिवसातून एकवेळचे जेवण सुद्धा नाही अशा निराधार, गरजू व अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या तळोद्यातील जवळपास 70 च्या आसपास वृद्धांना नैवेद्य फाउंडेशनच्या वतीने एकवेळचे जेवण मोफत देण्यात येते. मात्र त्यांची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता भविष्यात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो हे हेरत, सहयोग सोशल ग्रुपने या वृद्धांची आरोग्य तपासणी करण्याचे ठरविले. त्यानुसार दिवाळीचे औचित्य साधत काल गुरुवारी पोलीस लाईनच्या जवळ एक दिवसीय आरोग्य शिबीर राबविले. यावेळी 44 महिला व 16 पुरुष अशा एकूण 60 वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी वृद्धांची रक्त, थुंकी, शुगर, बी.पी. व ईसीजी आदी चाचण्या घेण्यात आल्यात व त्यांच्यावर आजारानुरुप मोफत औषधोपचार सुद्धा करण्यात आला.

यावेळी सहयोग सोशल ग्रुपचे सदस्य अ‍ॅड.अल्पेश जैन, डॉ.संदिप जैन, डॉ.योगेश बडगुजर, डॉ.सुनील लोखंडे, डॉ.महेश मोरे, डॉ.लक्ष्मीकांत चौधरी, सम्राट महाजन, यादव जिरे आदी उपस्थित होते. यावेळी गणेश पाटील, सोहेल मंसुरी, संदीप पाडवी, गणेश चव्हाण, प्रमोद मिस्त्री, नितीन पाटील, तेजस सूर्यवंशी, तुकाराम पावरा, गणेश कडोशिया, दीपक गुरव आदींनी सहयोग ग्रुपच्या सदस्यांना मदत केली. यावेळी स्वप्नील परदेशी यांनी सर्व वृद्धांना मोफत चादर व बिस्कीट पाकीट यांचे वाटप केले. यावेळी तळोदा उपजिल्हा रुग्णालयाचे जितेंद्र नायदे, शीतल पाटील तसेच अथर्व लॅबचे राहुल पाटील, ओम लॅबचे रवी चव्हाण आदींनी सहकार्य केले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी नैवेद्य फाऊंडेशनचे योगेश चव्हाण, आदिल शेख, पुष्पेंद्र दुबे, मनीष शहा, योगेश पाडवी, जुबेर सय्यद, हुसेन बोहरी, राहुल राणे, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, पूजा मराठे, सुनीता मराठे आदींनी परिश्रम घेतले.

दिवाळीत लावलेल्या दिवेच्या ज्योतीने गरिबांच्या, निराधारांच्या आयुष्यात सुध्दा आरोग्यमय प्रकाश पडावा या हेतूने आमच्या सहयोग सोशल ग्रुपच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर राबवून नेवैद्य फाउंडेशनचे जे लाभार्थी आहेत त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आलेत.
– अ‍ॅड.अल्पेश जैन
सदस्य, सहयोग सोशल ग्रुप

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!