Type to search

आमलाड येथील पुलाचे काम संथगतीने

maharashtra नंदुरबार

आमलाड येथील पुलाचे काम संथगतीने

Share
चिनोदा.ता.तळोदा । वार्ताहर- तळोदा तालुक्यातील आमलाड येथे अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावरील पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून अत्यंत कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

तळोदा तालुक्यातील आमलाड येथे अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावर पूल बांधकाम करण्याचे काम सुरू आहे. सदर रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे सदरच्या ठेकेदाराने वाहतुकीला ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून पुलाच्या खालच्या बाजूने मातीचा कच्चा रस्ता तयार करून दिलेला आहे. सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकीवरून अनेक प्रवासी पडून अपघात होत आहेत. रस्त्यावर वेळेवर पाणी न मारल्यामुळे मोठयाप्रमाणावर धुळ उडत आहे, त्यामुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा परिस्थितीत दुचाकीस्वार व अवजड वाहन हळू मार्गक्रमण करीत असतात. त्यामुळे त्याठिकाणी वेळो-वेळी वाहतूक ठप्प होत असते. त्यामुळे प्रवाशांना तासनतस वाहतूकीमध्ये अडकून रहावे लागत आहे. परंतु याबाबत संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत असून, पाणी कुठेतरी मुरते आहे असे प्रवास करणार्‍या नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्त्यावर लवकरात लवकर मुरूम टाकण्याची मागणी परिसरातील नागरिकांतर्फे वेळोवेळी करण्यात येते आहे.

येत्या जून महिन्यात पावसाळा सुरु होण्याच्या मार्गावर असतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याच्या आधी पुलाचे काम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मान्सून सुरू होण्याच्या आधी काम पूर्ण न झाल्यास ठेकेदाराने तयार करून दिलेल्या पर्यायी मार्गावर ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे सदर पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी आमलाड परिसरातील नागरिक व प्रवासी यांच्याकडून करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!