Type to search

वृक्षारोपण करुन महाराणा प्रताप जयंती साजरी

maharashtra नंदुरबार

वृक्षारोपण करुन महाराणा प्रताप जयंती साजरी

Share
चिनोदा.ता.तळोदा । वार्ताहर- तळोदा तालुक्यातील कढेल गावातील ग्रामस्थ व तरुणांनी क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त 36 वृक्षांची लागवड करून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.

आधुनिक युगात प्रत्येक तरुणांच्या हातात हजारो किंमतीचे मोबाईल व त्यामध्ये पबजी व लुडो सारखे गेम असतात. त्यामुळे दिवस रात्रभर मोबाईलमध्ये गेम खेळणारे हात अचानक निसर्गाचा समतोल राखण्याचे कामही करू शकतात असे, आदर्श काम कढेल येथील तरुण करून दाखवित आहेत. सध्याच्या काळात गावातील तरुण अनेक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एकत्र येऊन, बँड, डीजेवर नाचत महाराणा प्रतापजींची मिरवणूक काढून मोठया उत्साहात जयंती साजरी करीत असतात.

परंतु कढेल येथील तरुणांनी महाराणा प्रताप जयंती ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली आहे. गावातील परिसरात वृक्षांची लागवड करून जयंती साजरी करीत समाजाला एक अनोखा संदेश देण्याचे काम या तरुणांनी केले आहे. यामुळे या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कढेल येथील तरुणांमार्फत पूर्ण गावात छत्तीस वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला आहे. या उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!