Type to search

maharashtra नंदुरबार

रोझवा येथे ऊस जळाल्याने पाच लाखाचे नुकसान

Share
चिनोदा ता. तळोदा । वार्ताहर – तळोदा तालुक्यातील रोझवा शिवारात शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तोडणीस आलेल्या पाच एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या शेतकर्‍याचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, चिनोदा येथील शेतकरी महेंद्र बबनराव मराठे यांचे रोझवा शिवारात गट नं. 47/1 हे ऊसाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात एकूण आठ एकर ऊसाची लागवड केली आहे. या क्षेत्रामध्ये महावितरणचे विद्युत ट्रान्सफार्मर आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4:30 वाजेच्या सुमारास विद्युत ट्रान्सफार्मवर शाँर्ट सर्किट होऊन ऊसावर पडल्याने ऊसाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले.

यात पाच एकर क्षेत्रावरील ऊस खाक झाला. यात साधारण पाच लाखाचे नुकसान झाले आहे.सदर घटनेची माहिती कळताच सदर शेतकरी शेतात पोहचतो तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता. तरी तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी यांच्याकडून करण्यात आली आहे. वारंवारच्या घटनेमुळे शेतकरी त्रस्त आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!