Type to search

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; आमलाड-बोरद रस्त्यावरील घटना

maharashtra नंदुरबार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; आमलाड-बोरद रस्त्यावरील घटना

Share
चिनोदा, ता.तळोदा । वार्ताहर – तळोदा तालुक्यातील आमलाड-बोरद रस्त्यावर अपघात होण्याची मालिका सुरूच आहे. दि.14 रोजी रात्री 10 च्या सुमारास दुचाकीस्वार गोपाळ अशोक पाटील रा.तळवे हा अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे रस्त्यालगत असलेल्या खड्यात पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

तळोदा तालुक्यातील तळवे येथील गोपाळ अशोक पाटील तालुक्याच्या ठिकाणी व्यक्तिगत कामासाठी गेला होता. सदर काम आटोपून घरी परत येत असतांना रात्री 10 च्या सुमारास आमलाड व तळवे रस्त्यादरम्यान अनिल उद्धव पाटील यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे रात्रीच्या वेळी खड्डा अस्पष्ट दिसल्याने ते खड्ड्यात पडले व त्यांच्या डोक्यावर दुचाकी पडली. त्यामुळे ते जागीच मृत्युमुखी झाल्याची घटना घडली आहे. सकाळी सातच्या सुमारास केळी वाहतूकदार व मजूर वर्ग तळोदा रस्त्याने जात असल्याने यांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती सर्व परिसरात वार्‍यासारखी पसरली. ग्रामस्थ घटनास्थळी पोहचल्याने सदर मयतास तळोदा येथील तालुका रुग्णालयात दाखल केरून, शव विच्छेदन करण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलीस स्टेशन येथील हवालदार अरुण कोकणी व त्यांच्या सहकार्‍यांनी पाहणी केली. अज्ञात वाहकाविरुद्ध कलम 304/अ, 279, 337, 427, एम.व्ही.अक्ट 134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉ.अरुण कोकणी करीत आहेत.

सदर रस्त्यावर दररोज अपघात होत असल्याने अनेक प्रवासी जखमी होऊन प्राणही गमवावा लागत आहे. त्यामुळे आमलाड-बोरद रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!