बालविज्ञान संमेलनात प्राजक्ता चिनावलकर प्रथम
Share

शहादा –
मराठी विज्ञान परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या बालविज्ञान संम्मेलनात राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान वर्गातील विद्यार्थिनी कु.प्राजक्ता चिनावलकर हिने सादर केलेल्या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
व्ही.डी.चौगले फाऊंडेशन फॉर रिसर्च अँड एज्युकेशन या ट्रस्टमार्फत मराठी विज्ञान परिषद व होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नववे राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन 2019 नुकतेच होमी भाभा शिक्षण केंद्र मान खुर्द, मुंबई येथे आयोजित करण्यात आले.
मराठी विज्ञान परिषद व डॉ.होभी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात आयोजित नवव्या बाल विज्ञान संमेलनात राज्यभरातील शालेय व कनिष्ठ महाविद्यालयातील 200 विद्यार्थ्यांनी वैयक्तिक गट स्वरूपात 104 प्रकल्प सादर केलेत. शहरी व ग्रामीण भागातून राज्यभरातील विद्यार्थ्यांनी दैनंदिन समस्यांवर वैज्ञानिक दृष्टीकोणातून प्रकल्प सादरीकरण केले.
कनिष्ठ महाविद्यालयीन मोठया गटात पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थींनी प्राजक्ता नितीन चिनावलकर (11वी विज्ञान) हिने प्रथम क्रमांक पटकाविला. प्राजक्ताने 2019 चा पूर, घटना, परिणाम व भविष्यात घ्यावी लागणारी काळजी या विषयावर प्रकल्प सादर केला. तिला मार्गदर्शन प्रा. शिवनाथ पटेल यांनी केले.
तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक पी.आर.पाटील, प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य प्रा.डॉ.आर.एस. पाटील, पर्यवेक्षक प्रा.इंदिरा पटेल, पर्यवेक्षक प्रा.कल्पना पटेल तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी कु.प्राजक्ताचे कौतुक केले. कु.प्राजक्ता ही प्रा.आरती सरोदे व नितीन चिनावलकर (बी.एड. कॉलेज, लोणखेडा) यांची कन्या तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.पितांबर सरोदे यांची नात आहे.