चेस लिग स्पर्धेची दोन जुलैपासून सुरुवात

0

नंदुरबार । दि.24 । प्रतिनिधी-नंदुरबार जिल्हा बुद्धीबळ संघटनेतर्फे चेस लिग स्पर्धा आयोजीत करण्यात आली असून दि. 2 जुलैपासून नंदुरबार, नवापूर, तळोदा, दोंडाईचा व शहादा येथे त्याची सुरूवात होत आहे. या स्पर्धेसाठी चार गट पाडण्यात आले आहेत.

दि.2 जुलै रोजी जी.टी. पाटील महाविद्यालयातील जिमनॅशियन हॉल येथे चेस लिग स्पर्धेची सुरूवात होत आहे. यामध्ये 9 वर्षाआतील, 13 वर्षाआतील, 17 व 19 वर्षाआतील गटासाठी ही स्पर्धा नंदुरबार, नवापूर, तळोदा, दोंडाईचा, शहादा शहरात स्वतंत्र खेळल्या जातील.

यामधून 5 विद्यार्थ्यांचा गट निवडला जाईल. त्यांच्यात आपसात स्पर्धा होतील. या स्पर्धा प्रत्येक रविवारी विविध ठिकाणी घेतल्या जातील.

नंदुरबारसाठी प्रा.सुभाष मोराणकर, नवापूरसाठी मनिष पटेल, तळोदासाठी किनगांवकर, शहादासाठी जे.आर. पाटील तर दोंडाईचासाठी श्रीमती लखोटीया यांच्याकडे नावे नोंदवावीत.

प्रत्येक शहरात सुरूवातीला 2 जुलै रोजी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख बक्षिस दिले जाईल.

नंदुरबार जिल्हा बुद्धीबळ संघटनेतर्फे सदर स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष श्रीकांत अग्निहोत्री, कार्याध्यक्ष केदार पाटील, डॉ.नरेंद्र गोसावी, चंद्रशेखर जयस्वाल, राहुल खेडकर, संदीप साळुंके, नरेंद्र साबुवाला, प्रविण भदाणे, प्रा.डी.ए. पाटील यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*