विकासकामांमुळे विश्वास जिंकला

0
नंदुरबार । दि.22 । प्रतिनिधी-पालिकेने गेल्या दहा वर्षात विकास तणडऊ कामे केली आहेत. त्यामुळे नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
येत्या काही दिवसात याच माध्यमातून कामे करुन नंदुरबारची राज्यातील प्रमुख दहा शहरांमध्ये गणना होईल, असा विश्वास आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
येथील सीबी गार्डन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ.रघुवंशी म्हणाले, पाच वर्षापुर्वी पालिका निवडणूकीच्या वेळी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची बहुतांश पुर्तता आम्ही केली आहे.
येत्या दिवसात प्रगतीपथावर असलेले सर्व प्रकल्प पुर्ण होतील. त्यामुळे नंदुरबार शहराची ओळख राज्यातील प्रमुख दहा शहरांमध्ये होईल, अशी खात्री आहे.

दिलेला शब्द पाळल्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. आजही शहराला 15 ऑगस्टपर्यंत पुरेल, एवढा जलसाठा पालिकेकडे शिल्लक आहे.

त्यामुळे राज्यभरात दुष्काळाची परिस्थिती असतांना नंदुरबार शहरात कधीही पाण्याची चणचण भासली नाही.

मोठया शहरांमध्येही नाहीत असे रस्ते पालिकेने बनवले आहेत. भुमिगत गटारींची कामे झाली आहेत. नळवे येथे या गटारीतील घाण पाण्याचे शुद्धीकरण करुन ते शेतीसाठी व इतर वापरासाठी करण्यासाठीचा प्लांट पुर्णत्वाकडे आला आहे.

जुलै अखेरीस तो पूर्ण होईल व एक अभिनव असा प्रकल्प नंदुरबारात साकारला जाणार आहे. याशिवाय ई-ग्रंथालय, लोकनेते बटेसिंगभैय्या रघुवंशी उद्यानाचे कामही पूर्णत्वाकडे आले आहे.

तेथील जलतरण तलावाचे कामही सुरु आहे. त्याचे उद्घाटनही लवकरच केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज नाटय गृहातील खुर्च्यांंच्या दोन रांगेतील अंतर कमी असल्यामुळे ऑगस्ट महिन्यात नुतनीकरण करण्यात येणार असून आता 1 हजार 70 आसन क्षमता आहे, ते नुतनीकरणानंतर 950 ते 1 हजार होणार आहे.

याशिवाय 9.50 कोटीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पालिका राबविणार आहे. यासाठी शहरातील प्रत्येक घराला दोन डस्ट बिन देण्यात येणार असून एकात ओला व दुसर्‍यात कोरडा कचरा नागरिकांना जमा करावा लागणार आहे. पालिकेची गाडी दररोज हा कचरा गोळा करण्यासाठी येईल.

शहराच्या बायपास रस्त्यावर तयार होत असलेले नंदुरबार बीझीनेस सेंटर येथे तीन मल्टीप्लेक्स तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना महानगरांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी जावे लागणार नाही, असेही आ.रघुवंशी म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*