Photo Gallery : अश्वनृत्याने सांरगखेडा यात्रोत्सवात चैतन्य

0

नंदुरबार | प्रतिनिधी:  सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलमध्ये काल अश्वनृत्य स्पर्धा संपन्न झाल्या. यात विविध अश्‍वांनी केलेल्या नृत्याविष्कारामुळे अश्‍वप्रेमींनी समाधान व्यक्त केले.

चेतक फेस्टिवलमध्ये काल झालेल्या अश्वनृत्य स्पर्धेत ३२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील पाच विजयी घोड्यांची निवड करण्यात आली.

यास्पर्धेत गुजरात येथून आलेली वाघेला यांची मुन्नी, मध्यप्रदेश बडवाणी येथून आलेला सूर्या,राजस्थान जव्हेर येथून आलेली कॅटरिना महाराष्ट्रातील हिरापुर येथून आलेला मोती आणि गुजरात येथून आलेली जानकी यांची निवड झाली आहे.

या अश्वनृत्य स्पधर्ंमध्ये घोड्यांनी दिलखेच अदा सादर केल्या. घोड्यांचा दिलखुलास अदांना अश्वप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.

अश्वनृत्यस्पर्धा पाहण्यासाठी देशभरातून अश्वशौकिन दाखल झाले आहेत. या स्पर्धंमधील पहिल्या येणार्‍या अश्वाला एक लाख रुपयांचा पुरस्कार दुसरा पुरस्कार ७५ हजार तर तिसरा ५० हजार, चौथा २५ हजाराचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर पाचव्या क्रमांक आलेल्या घोड्याला ७ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*