पक्ष मजबूतीसाठी भाजपाच्या विविध आघाडयांची निवड

0
शहादा । दि.24 । ता.प्र.-भारतीय जनता पार्टीने पक्ष व संघटना मजबूत करण्यासाठी शहर भाजपा अध्यक्ष जितेंद्र भिमराव जमदाडे यांच्यासह विविध आघाड्यांच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती शहादा-तळोदा विधानसभेचे आ.उदेसिंग पाडवी यांनी केली आहे.
केंद्रातील व राज्यातील निवडणूका होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला गेला आहे. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संघातील निवडणूका येत आहेत. कार्यकर्ता यांनी संघटना मजबुतीसाठी जोमाने कामाला लागावे.

मरगळ दूर व्हावा यासाठी शहरातील विविध विषय समितीचे पदाधिकारी व सदस्यांच्या नावाची घोषणा आ.पाडवी यांनी नुकतीच तैलिक मंगल कार्यालयात केली आहे.

यात विषय समिती व अध्यक्ष यांची नावे अशी, शहादा शहर भाजपा अध्यक्ष जितेंद्र भिमराव जमदाडे, शहादा शहर युवा मोर्चा अध्यक्ष मनोज प्रकाश वाडीले, आघाडी व मोर्चा महिला अध्यक्ष नंदाताई मनोज सोनवणे, दलित आघाडी अध्यक्ष पिरण नामदेव मोरे, अल्पसंख्यांक आघाडी अबरार शाह रहिम शाह, आदिवासी आघाडी तुषार राजेश पाडवी, अटक्या विमुक्त जितेंद्र सुरेश सिकलीकर, इतर मागासवर्गीय मोर्चा हेमराज प्रकाश मोरे, वैद्यकीय आघाडी डॉ.विनोद परदेशी, कायदा आघाडी आनंद निकम, शिक्षण आघाडी शांतीलाल बागले, कामगार आघाडी घनश्याम चव्हाण, अपंग आघाडी कैलास मोहनलाल चोरडीया, व्यापारी आघाडी अजित स्वरुपचंद बाफना, सांस्कृतिक आघाडी निलेश राजपूत, ज्येष्ठ नागरीक आघाडी, दिलीप भांडारकर, मनोगत मासिक प्रमुख प्रदीप जैन, प्रमोद महाजन कै.वि. योजना कमलेश जांगेड व सहकार आघाडी केशव पाटील यांची अध्यक्षपदावर नियुक्ती झाली असून एकूण 19 समितीत 18 ते 20 सदस्य, पदाधिकारी घेतले आहेत.

 

LEAVE A REPLY

*